नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनवर आणखी एक बेस्ट फोन येत आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता आणि अर्ध्या किमतीत सॅमसंग फोन खरेदी करू शकता. Samsung Galaxy S24 5G चा फोन मिळू शकणार आहे.
तुम्हाला हा फोन जवळजवळ अर्ध्या किमतीत मिळणार आहे. कंपनीने Samsung Galaxy S24 5G ७४९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला. सध्या, हा फोन फ्लिपकार्टवर ३९९९९ मध्ये लिस्टेड झाला आहे. म्हणजे तुम्ही हा फोन ४०००० पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट ३९९९९ मध्ये मिळणार आहे. तुम्हाला त्यावर बँक डिस्काउंट देखील मिळेल. तुम्हाला विविध बँक कार्डवर ४००० ची डिस्काउंट मिळत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन ३५९९९ मध्ये खरेदी करू शकाल.
Samsung Galaxy S24 5G मध्ये ६.२-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरल ३ प्रोसेसरने लेस आहे आणि गॅलेक्सी एआयला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 128 GB आणि 256 GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. सेकंडरी कॅमेरामध्ये 12MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 10MP टेलिफोटो लेन्स असणार आहे.


