मुंबई : बिग बॉसच्या घरात अनेक घडामोडी घडत आहेत. रविवारी देखील हा एपिसोड मजेदार असा बनला होता. शनिवारी दबंग सलमान खानने घरातील सदस्यांचा क्लास घेतला. त्यातच रविवारी गायक मिका सिंग आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी एंट्री केली. शोमध्ये मिका आणि सोनाक्षीला सलमानसोबत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.
मिका सिंग त्याच्या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसमध्ये आला आहे. यादरम्यान, तो स्पर्धकांसोबत खूप मजा करताना दिसणार आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये, मिका गाणे गाताना आणि नाचताना. सलमान देखील मिकासोबत दिसून आला. मिका सिंग घरातील सदस्यांसोबत खूप मजा करताना दिसून आला. त्याच्या या हजेरीने शोचे पूर्ण वातावरणच हलके केले. घरात आनंदाचे वातावरण होते.
सोनाक्षी सिन्हानेही शोमध्ये धमाल केली. तिने घरातील सदस्यांना एक खास काम दिले होते, ज्यामध्ये स्पर्धकांना कोणाचे हेतू दुष्ट वाटतात हे ओळखायचे होते. या कामात तान्याने मालतीचे नाव घेतले आणि नीलमने फरहानावर निशाणा साधला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद आहेत.


