पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र पुणे व गोवा उपक्षेत्र येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र पुणे व गोवा उप क्षेत्र येथे सहाय्यक व्यवस्थापक (लेखा), बिलिंग लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२५ ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 18000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. ३५-४० वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी व्यवस्थापक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया कॅन्टीन (यूआरसी) फोर्सेस क्लब लेफ्टनंट कर्नल तारापोर रोड कॅम्प, पुणे – 411 001 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (लेखा), बिलिंग लिपिक.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वयोमर्यादा : सहाय्यक व्यवस्थापक (लेखा) : ५० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी, बिलिंग लिपिक : ३५-४० वर्षांपर्यंत.
– वेतन / मानधन : सहाय्यक व्यवस्थापक (लेखा) : दरमहा रु. 18,000/- , बिलिंग लिपिक : पात्रतेनुसार
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : १० दिवस (०५ नोव्हेंबर २०२५).
– अर्ज पाठवण्याचा पत्त : व्यवस्थापक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया कॅन्टीन (यूआरसी) फोर्सेस क्लब लेफ्टनंट कर्नल तारापोर रोड कॅम्प, पुणे – 411 001.


