Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापुरात भाजपचा मोठा राजकीय डाव! शिंदे आणि अजित पवार गटाला धक्का

सोलापुरात भाजपचा मोठा राजकीय डाव! शिंदे आणि अजित पवार गटाला धक्का

Solapur Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठं यश मिळवण्यासाठी भाजपने आपले राजकीय डावपेच अधिक तीव्र केले आहेत. विरोधकांनंतर आता महायुतीतील मित्रपक्षांवरच भाजपची नजर गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला धक्का दिल्यानंतर, आता शिंदे गटातील नेत्यांनाही भाजप आपल्या गोटात खेचण्यासाठी सक्रिय झाली आहे.

मोहोळमध्ये मोठी उलथापालथ

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भाजपने आपल्या सहयोगी पक्षालाच मोठा धक्का दिला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश शिरसागर आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, नागनाथ क्षीरसागर हे भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. मात्र आता दोघेही एकाच पक्षात येत असल्याने स्थानिक राजकारणात मोठे समीकरण बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या प्रवेशामुळे भाजपने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही सहयोगी पक्षांच्या संघटनेवर थेट परिणाम घडवला आहे.

हेही वाचा –नव्या वर्षात पुणेकरांना मोठी भेट..! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो होणार सुरु, तारीख आली समोर

महायुतीत वाढली अंतर्गत नाराजी

भाजपमध्ये सुरू असलेल्या नेत्यांच्या सततच्या इनकमिंगमुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. महायुतीत नाराजी वाढल्याने सत्ताधारी गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, भाजप आता स्थानिक निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांच्या नेत्यांना आकर्षित करून स्वतंत्र बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

अजित पवार गटालाही धक्का

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी आमदार राजन पाटील तसेच यशवंत माने हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची पकड आणखी मजबूत होईल.

सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

भाजपच्या या आक्रमक हालचालींमुळे सोलापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांचा उदय होऊ लागला आहे. महायुतीतील सहयोगी पक्षांच्या नाराजीमुळे पुढील काही दिवसांत नवे पक्षांतरण आणि राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!