पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) गेल्या दहा दिवसांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवार (दि. २७) पासून विद्यार्थ्यांना आयटीआयचे पर्याय अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तालुका, जिल्हा व राज्य या क्रमाने विद्यार्थ्यांना राज्यभरातील कोणत्याही आयटीआयचा पर्याय अर्जामध्ये दाखल करता येणार आहे.
दरम्यान, काही आयटीआयमध्ये १७ तारखेपासून विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. तसेच, अर्ज निश्चिती करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी येथील आयटीआयसाठी १२०, कासारवाडी येथील महिला आयटीआयसाठी १७ ऑनलाईन अर्ज आले आहेत. येथील दोन्ही आयटीआय मिळून ५०० जागा आहेत.


