पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान येथे कनिष्ठ संशोधन फेलो या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. सदर मुलाखत ही तारीख 12 जानेवारी 2026 घेतली जाणार आहे. तुम्हाला edpenchfoundation@mahaforest.gov.in या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ccras.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन फेलो.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 37000
– वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 12 जानेवारी 2026
– मुलाखतीचा पत्ता : प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, कोथरूड, पुणे – ४११ ०३८ (महाराष्ट्र).
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : edpenchfoundation@mahaforest.gov.in


