पुणे : राज्य सरकारच्या महापारेषण विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२६ असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महापारेषण अति उच्च दाब (संवसु) विभाग, बीड येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री).
– रिक्त पदे : 54 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बीड.
– आस्थापना नोंदणी क्रमांक : E11162703222
– शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, एनसीव्हीटी, इलेक्ट्रिशियनमध्ये आयटीआय.
– वयोमर्यादा : १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन नोंदणी.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ फेब्रुवारी २०२६.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : कार्यकारी अभियंता, अति उच्च दाब (संवसु) विभाग, बीड, १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड..
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


