पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुणे महानगरपालिकेत अभियांत्रिकी इंटर्न-स्थापत्य, अभियांत्रिकी इंटर्न-विद्युत, अभियांत्रिकी इंटर्न-यांत्रिकी, माळी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 255 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य, अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत, अभियांत्रिकी इंटर्न – यांत्रिकी, माळी.
– एकूण रिक्त पदे : 255 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15000/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2026.


