पुणे : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला आता अर्ज करता येणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे प्रकल्प सहयोगी-II यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-II.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर
– वेतन / मानधन : दरमहा रु. 28,000/- ते रु. 35,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.neeri.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


