Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती

मुंबई: राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे प्रस्ताव स्वतः तयार करून पाठवावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात या विषयी झालेल्या बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, संचालक कृष्णकुमार पाटील, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या योजनेत सुटसुटीतपणा असावा असे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, यासाठी कमीत कमी कागदपत्रांची मागणी असावी. हे सानुग्रह अनुदान सध्या असलेल्या रकमेऐवजी वाढवून देण्याचा प्रस्ताव तीन आठवड्यात सादर करावा. या योजनेचा निधी वर्षाच्या सुरुवातीस मिळण्याविषयीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेत, या प्रकरणाचे प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावेत, अशा सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!