पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’, मुंबई येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’, मुंबई येथे असिस्टंट मॅनेजर (E2) आणि एक्झिक्युटिव्ह (E0) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 75 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया
- पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (E2) आणि एक्झिक्युटिव्ह (E0).
- एकूण रिक्त पदे : 75 पदे.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई.
- वेतन / मानधन : दरमहा रु. 30,000/- ते रु. 1,60,000/- पर्यंत.
- वयोमर्यादा : २८ वर्षांपर्यंत.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी).
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ०६ सप्टेंबर २०२५.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.shipindia.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


