पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आर्मी पब्लिक स्कूल येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
आर्मी पब्लिक स्कूल, अहिल्यानगर येथे मुख्याध्यापक (प्राथमिक आणि माध्यमिक शाखा), मुख्याध्यापक (पायाभूत पातळी), पीपीआरटी, पीआरटी, टीजीटी, क्रियाकलाप शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, विशेष शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, मुख्याध्यापक, प्रशासकीय पर्यवेक्षक, अधिनियम लिपिक, निम्न विभाग लिपिक, गट ‘ड’ कर्मचारी, समुपदेशक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, ग्रंथपाल या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहिल्यानगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2025 ही असणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी प्राचार्य, एपीएस (एमआयसी अँड एस), सी/ओ अॅडमिनिस्ट्रेशन अँड डेपो बंगला, एमआयसी अँड एस, अहिल्यानगर-४१४११० येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.apsahmednagar.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


