Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेवटी सरकारी अधिकारीच… सांगूनही ऐकलं नाही, हलक्यात घेतलं, सरनाईकांनी ST अधिकाऱ्याला जागेवर निलंबित केलं

शेवटी सरकारी अधिकारीच… सांगूनही ऐकलं नाही, हलक्यात घेतलं, सरनाईकांनी ST अधिकाऱ्याला जागेवर निलंबित केलं

सोलापूर : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला २८ नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा एकदा भेट दिली. या भेटी दरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती, अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती.

जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना पुन्हा आढळून आले. पाणपोईच्या ५ नळा पैकी केवळ एकच नळ सुरू होता. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले.

विशेष म्हणजे मागील आठवड्‌यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्चः तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधामध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम देखील भरला होता. परंतु सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीब‌द्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे अत्यंत नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत.

तथापि, राज्यातील एसटीच्या 251 आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषतः बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!