Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून निषेध

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून निषेध

Nashik Crime: नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एक पत्रकार गंभीर अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. पत्रकार संघटना या घटनेवर निषेध व्यक्त करत आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवत जखमी पत्रकारांच्या तब्येतीची चौकशी केली.

छगन भुजबळ यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देखील आज रात्री नाशिकमध्ये दाखल होणार असून ते जखमी पत्रकारांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी करतील. या घटनेमुळे पत्रकारितेच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून दोषींविरोधात तातडीची कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!