Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Cyber Crime: सावधान! वाहतुकीचा नियम मोडल्याचा मेसेज आलाय? उघडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Pune Cyber Crime: सावधान! वाहतुकीचा नियम मोडल्याचा मेसेज आलाय? उघडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Pune Cyber Crime: पुणे शहरात सायबर चोरट्यांनी आता वाहतूक नियमांच्या नावाखाली नागरिकांना लुटण्यास सुरुवात केली आहे. टिळक रस्ता परिसरातील एका व्यक्तीला ‘वाहतुकीचा नियम मोडला आहे’ असा बनावट मेसेज पाठवून तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आरटीओच्या नावाने आलेल्या या बनावट मेसेजमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सायबर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सायबर चोरट्यांची नेमकी ‘मोडस ऑपेरंडी’
विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित व्यक्तीच्या मोबाईलवर आरटीओकडून आल्याचे भासवणारे एक ‘चलान नोटिफिकेशन’ आले होते. या मेसेजसोबत एक फाईल जोडलेली होती, जी अधिकृत सरकारी कागदपत्र असल्याचा भास निर्माण करत होती. तक्रारदाराने ती फाईल डाऊनलोड करून उघडताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. चोरट्यांनी मालवेअरच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा मिळवला आणि काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम लंपास केली.

‘मालवेअर’चा नवा सापळा 
सध्या पुणे शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले असून चोरटे केवळ ट्रॅफिक चालानच नाही, तर इतर विविध क्लृप्त्या वापरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने थकीत वीज बिल भरणे, गॅस कनेक्शन कापले जाण्याची भीती दाखवणे किंवा बँक केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या नावाखाली घातक ‘मालवेअर’ फाईल्स पाठवल्या जात आहेत. एकदा का ही फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड झाली, की युजरचा सर्व डेटा आणि बँकिंग माहिती चोरट्यांच्या हाती लागते.

सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांचे आवाहन
या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अधिकृत सरकारी कामांसाठी किंवा चलान भरण्यासाठी नेहमी अधिकृत संकेतस्थळांचा किंवा ॲप्सचाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद फाईल्स डाऊनलोड करणे आर्थिक सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरू शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!