Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रागात का पाहतो? यावरून चौफुला येथे रेणुका कला केंद्रात राडा; गोळीबारासह कोयत्याने जीवघेणा हल्ला

रागात का पाहतो? यावरून चौफुला येथे रेणुका कला केंद्रात राडा; गोळीबारासह कोयत्याने जीवघेणा हल्ला

दौंड: पुणेसोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत आणि दौंड तालुक्यातील चौफुला येथील लोककला केंद्र सध्या गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचे केंद्र बनले की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी चौफुला वाखारी हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात आमदार शंकर मांडे यांच्या भावाने आणि इतर सहकाऱ्यांनी लावणी लावण्याच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली होती.

रागात का बघितले? यावरून वाद सुरू झाला. त्यात एकावर धारधार कोयत्याने फिल्मी स्टाईल सपासप वार करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी 14 तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या आसपास घडली. याबाबत यवत पोलीस ठाण्यात चोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य ऊर्फ आदिनाथ ईश्वर गिरमे, रोहीत राजु भिसे (दोघेही रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) तसेच वरवंड येथील दोन अनोळखी मित्र असे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या हल्ल्यात पाटस येथील साहिल बापू जाधव वय 19 गंभीर जखमी झाला आहे. साहिल जाधव हा मित्रासोबत रेणुका कला केंद्रात लावणी केंद्रासमोर असलेल्या हॉटेल बिअरबारमध्ये दारु पिऊन रेणुका कला केंद्रात लावणीचा कार्यक्रम बघण्यासाठी गेला होता. यावेळी दोन गटात लावणी लावण्यावरुन शाब्दिक चकमक उडाली. तसेच पाटस टोल नाक्यावर तू माझ्याकडे रागाने का पाहिले? या वादातूनच एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची चर्चा चौफुला आणि पाटस परिसरात आहे.

दरम्यान याप्रकरणी रेणुका कला केंद्रात झालेल्या वादानंतर पाटस टोलनाक्यावर रागाने का बघितले? म्हणून कोयत्याने मानेवर, डोक्यावर, हातावर वार करत जीवघेणा हल्ला केल्याची फिर्याद साहील जाधव‌ यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!