Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यातील निंबाळकरवाडीत आढळला कुजलेला मृतदेह; संशयिताला 12 तासांत अटक

Pune Crime: पुण्यातील निंबाळकरवाडीत आढळला कुजलेला मृतदेह; संशयिताला 12 तासांत अटक

Pune Crime: कात्रजजवळील गुजर-निंबाळकरवाडी परिसरात शनिवारी दुपारी एक भयावह घटना उघडकीस आली. गवतामध्ये कुजलेला आणि विद्रूप अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताच्या छातीवर ‘७८६’ असा टॅटू आढळल्याने प्रकरण अधिक गूढ बनले. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. मृताची ओळख सदाम उर्फ सलमान शेख अंदाणे (वय ३५-४०, गुजर निंबाळकरवाडी, कावज, पुणे) अशी पटली.

भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास पथकाने तातडीने संशयिताचा शोध सुरू केला. मोबाईल डेटा विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मृताचा मित्र विक्रम पैठा रोटिया याच्यावर संशय व्यक्त केला. तो पुण्यातील सणसनगर माळवाडी, निंबाळकरवाडी येथे भाड्याने राहत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी गुजरवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात यश मिळवले.

हेही वाचा – Ravindra Dhangekar : ‘महायुतीत दंगा नको’च्या सल्ल्यावर धंगेकरांचा पलटवार, म्हणाले…पुणेकरांसाठी ‘त्याची’ किंमत मोजायला तयार…

या जलद कारवाईचे श्रेय एसपीआय राहुल चितारे, पीएसआय नीलेश मोकाशी, निरीक्षक समीर शेंडे, तसेच अधिकारी सागर बोर्मे, विठ्ठल चिपाडे, सौरभ वाडे, महेश बरवकर, मंगेश पवार, नीलेश बैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम मुतार, तदीप आगळे, मितेश चोरमले आणि अभिनय चौधरी यांच्या समन्वित पोलिस पथकाला दिले जाते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांनी आपल्या टीमचे कौतुक करत म्हटले की, फक्त १२ तासांत प्रकरण उकलणे हे पोलिसांच्या तात्काळ प्रतिसाद आणि टीमवर्कचे उदाहरण आहे. दरम्यान, पोलिस तपास सुरू असून हत्येमागील अचूक हेतू शोधण्याचे काम सुरू आहे. तथापी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, आणि अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!