नाशिक : तलवारीचा धाक दाखवून ‘पाच लाख रुपये दे, अन्यथा तुझा व तुझ्या मुलीचा जीव घेईन’ अशी धमकी देत कृष्णा बाळू गायकवाड व इतर दोघा सशयितांनी मारहाण केल्याची तक्रार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कांताप्रसाद मिश्रा (वय ४८, रा. जेलरोड, नाशिकरोड) हे १६ जुलै रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर गाडी लावून उभे असताना कृष्णा गायकवाड (रा. गणेशनगर, नांदूरगाव) आणि इतर दोघे त्यांच्याजवळ आले व त्यांनी मिश्रा यांना धमकी दिली. ‘मला पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझा व तुझ्या मुलीचा जीव घेईन, तुझ्या मुलीचा विवाह होऊ देणार नाही’, अशी धमकी देत संशयितांनी तलवारीचा धाक दाखविला. तसेच मुलीचे फोटो व्हायरल करून तिचा विवाह होऊ देणार नाही, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे तपास करीत आहे.


