Kharadi Drugs Party Case: खराडी येथे झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या प्रकरणात अटक झालेले प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींची फॉरेन्सिक चाचणी सोमर आली आहे. ज्यात त्यांनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पार्टीवर धाड टाकण्यापूर्वी आरोपींनी ड्रग्स घेतलेले नव्हते.या प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वी मिळालेल्या अहवालानुसार, त्यांच्यावर ड्रग्सचे कोणतेही प्रयोग झालेले नाहीत. हे रिपोर्ट न्यायालयातही सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणात भाजप नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. फॉरेन्सिक अहवालानंतर प्रांजल खेवलकर यांची तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. यामुळे प्रकरणातील आरोपींची बाजू काहीशी बळकट झाल्याचे दिसून येत आहे. हा मुद्दा त्यांच्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत हा अहवाल महत्त्वाचा ठरेल. फॉरेन्सिक चाचणीने प्रकरणाची दिशा बदलली आहे.
खराडी ड्रग्स पार्टी प्रकरण नेमकं काय?
हे प्रकरण पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीशी संबंधित आहे. २७ जुलै रोजी पुणे पोलिसांनी खराडी येथील एका खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. पार्टीच्या ठिकाणी पोलिसांना काही प्रमाणात अंमली पदार्थ आढळले होते. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यासह इतरांवर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी २५ जुलै रोजी देखील याच ठिकाणी पार्टी झाल्याचा दावा केला होता. प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते किंवा नाही हा या प्रकरणातील कळीचा मुद्दा होता.
तुरुंगवास, जामीन, फॉरेन्सिक अहवाल
प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर त्यांना दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहावे लागले. पुणे सत्र न्यायालयाने याच कळीच्या मुद्द्यावर विचार करून त्यांना जामीन मंजूर केला होता.आता या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे. या रिपोर्टमुळे अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप चुकीचा ठरला आहे. पोलिसांनी हे फॉरेन्सिक रिपोर्ट न्यायालयात देखील सादर केले आहेत. नुकतीच प्रांजल खेवलकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे.


