Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ravindra Dhangekar: ‘महायुतीत दंगा नको, पुण्याला गुन्हेगारीमुक्त करू’; एकनाथ शिंदेंचे रवींद्र धंगेकरांना आश्वासन

Ravindra Dhangekar: ‘महायुतीत दंगा नको, पुण्याला गुन्हेगारीमुक्त करू’; एकनाथ शिंदेंचे रवींद्र धंगेकरांना आश्वासन

पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यावर आता त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्र्यांनी धंगेकरांना काहीस शांत राहण्याचा सल्ला दिल्याचा चर्चा आहे. राज्यात महायुतीच सरकार आहे. जे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या त्रिकूटाने बनली आहे. त्यामुळे महायुतीत दंगा नको असा सल्ला एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) धंगेकरांना दिला. त्याचवेळी पुण्यातील गुंडांना पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं.

गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धंगेकरांच्या बॉसशी बोलतो असं म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी आपण स्वतः शिंदेंची भेट घेऊ आणि बाजू मांडू अशी भूमिका घेतली.

पुण्यातील एका कार्यक्रमात रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना महायुतीत दंगा नको असा सल्ला दिला

अजित पवारांकडून टोला

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निकटवर्तीय समीर पाटील याचा आणि घायवळचा थेट संबंध असल्याचा आरोप करत धंगेकरांनी चंद्रकात पाटलांकडे निर्देश केले होते. त्यानंतर महायुतीचा भाग असलेले अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. धंगेकर हे महायुतीत असल्याचा विसर पडला असा टोला अजित पवारांनी लगावला होता. त्यावर उत्तर देताना गुंड घायवळवरून चंद्रकांत पाटलांवर आपण आरोप केलेले नाहीत. उलट त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी सुनावलं. मी महायुतीत असल्याचा मला विसर पडलेला नाही असं प्रत्युत्तर त्यांनी अजित पवारांना दिलं.

महायुतीत दंगा नको, शिंदेंचा सल्ला

रवींद्र धंगेकरांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीत दंगा नको असं रवींद्र धंगेकरांना सांगितलं. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्यांना कोणताही त्रास होता कामा नये अशी भूमिका रवींद्र धंगेकरांनी मांडली होती. त्यावर आपण पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन दिलं. त्यावर पुण्याचे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!