Today बुधवार, 29th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; नवी मुंबईत महिला शिक्षिकेला अटक

इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; नवी मुंबईत महिला शिक्षिकेला अटक

नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला शिक्षिकेने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या महिला शिक्षिकेला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील ३५ वर्षीय शिक्षिका व पीडित मुलगा दोघेही एकाच शाळेत असून हा विद्यार्थी दहावीत शिक्षण घेत आहे त्यामळे त्यांच्यात चांगली ओळख होती. काही दिवसांपूर्वी या शिक्षिकेने पीडित मुलासोबत आपल्या मोबाईलवरील इन्स्टाग्राम अॅपद्वारे चॅटिंग केले होते. त्यानंतर या शिक्षिकेने स्वतःचे अर्धनग्न शरीर दाखवून त्याच्यासोबत अश्लील वर्तन केले होते. त्यावेळी पीडित विद्यार्थ्याने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड ठेवला होता.

रविवार, २७ जुलै रोजी पीडित मुलाच्या आईने तिच्या मुलाच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्यात त्यांना शिक्षिकेचे अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ निदर्शनास आला. त्यात या शिक्षिकेने अश्लील हावभाव, चाळे व बोलण्याच्या पद्धतीने अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाकडे त्याबाबत चौकशी केली असता या शिक्षिकेनेच त्याला संपर्क साधून अश्लील चाळे केल्याचे त्याने सांगितले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पीडित मुलाच्या पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी या महिला शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!