Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Umred Crime: उमरेड हादरले! किरकोळ शिवीगाळीतून माय-लेकीची लाकडी दांड्याने ठेचून हत्या

Umred Crime: उमरेड हादरले! किरकोळ शिवीगाळीतून माय-लेकीची लाकडी दांड्याने ठेचून हत्या

Umred Crime: नागपूर जिल्ह्यातील उमरेड जवळील गंगापूर शिवारात एका माथेफिरूने वृद्ध आई आणि तिच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पार्वताबाई फुकट आणि त्यांची मुलगी संगीता रिठे या गंगापूर शिवारातील नाल्याकाठी असलेल्या एका घरात वास्तव्यास होत्या. संगीता यांचे पती निवर्तल्यामुळे त्या आपल्या वृद्ध आईला आधार देण्यासाठी माहेरीच राहत होत्या. पार्वताबाई फुकट यांना सतत शिवीगाळ करण्याची सवय होती, अशी माहिती समोर आली आहे. याच कारणावरून परिसरातील एका व्यक्तीचा संताप अनावर झाला. संशयित आरोपीने शनिवारी सकाळी लाकडी दांड्याने या दोघींवरही हल्ला केला. या जीवघेण्या मारहाणीत पार्वताबाईंचा जागीच मृत्यू झाला, तर संगीता यांनी उपचारापूर्वीच प्राण सोडले.

हेही वाचा – कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट! हुंड्याच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; अटकेच्या भीतीने पतीनेही नागपुरात संपवलं जीवन

पुराव्यांची विल्हेवाट आणि पोलीस तपास

हत्येनंतर आरोपीने रक्ताने माखलेला लाकडी दांडा जवळच असलेल्या नदीकाठी फेकून देऊन पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चक्रावली. पोलिसांनी एका व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, हत्येमागे जुने काही वाद होते का, याचाही शोध घेतला जात आहे. परिसरातील रहिवाशांच्या मते, या माय-लेकी अत्यंत साध्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करत होत्या. किरकोळ कारणावरून झालेल्या या क्रूर हत्येमुळे उमरेड तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!