Today बुधवार, 22nd एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना धक्काबुक्की

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना धक्काबुक्की

पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसह तरुणींना पैलवानांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास सहकारनगरमधील तळजाई मैदानावर घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पैलवानांकडून तरुणांना मारहाण केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस भरतीची तयारी करणारे १५० ते १७० तरुण-तरुणी दररोज तळजाई मैदानावर सरावासाठी जातात. मंगळवारी सकाळच्या सुमारास तरुण सराव करत होते. त्या वेळी मैदानाच्या मध्यभागी चौघे पैलवान थांबले होते. त्यांना भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी बाजूला न होता, मुलांनाच धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी खात्यांतर्गत पीएसआय मैदानी परीक्षेचा सराव करणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने मध्यस्थी करत भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पैलवानांनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर साथीदारांना बोलावून घेतले.

पैलवानांच्या मदतीसाठी आलेल्या साथीदारांनीही तरुणांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. त्याचवेळी मध्यस्थी करणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्नही केला. मात्र, काही तरुणींनी दगड हिसकावून घेतल्याने दुर्घटना टळली. पैलवानांनी तरुणींचा विनयभंग करत त्यांचीही छेडछाड केल्याचा आरोप भरतीचा सराव करणाऱ्या तरुणींनी केला आहे. मागील काही दिवसांपासून संबंधित पैलवानांकडून आमचा पाठलाग केला जात आहे. त्यांच्याकडून अश्लील शिवीगाळ करत टोमणे मारणे, मुद्दामहून मैदान परिसरात थांबल्याचाही आरोप काही तरुणींनी केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!