Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Share Market: सलग तीन दिवस तेजीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरणीसह बंद; गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटी बुडाले

Share Market: सलग तीन दिवस तेजीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरणीसह बंद; गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटी बुडाले

Share Market: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून उद्या पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. आरबीआय रेपो रेट कायम ठेवण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 503.76 अंकांच्या घसरणीसह 83313.93 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक133 अंकांच्या घसरणीसह 25642.80 अंकांवर बंद झाला.

मेटल शेअरवर सर्वाधिक दबाव पाहायला मिळाला. निफ्टी निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक आणि हेल्थकेअरमध्ये देखील तेजी घसरण सुरु होती. निफ्टी निर्देशांकात थोडी तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीचा खेळ सुरु असताना बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 2.52 लाख कोटी रुपयांनी घसरलं. म्हणजेच गुंतवणूकदारांचं 2.52 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य बुधवारी 4,69,16,207.26 कोटी रुपये होते. त्यात आज घसरण पाहायला मिळाली. बीएसईचं आजचं बाजारमूल्य 4,66,63,868.67 कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच आजच्या दिवसात गुंतवणूकदारांचं 252338.59 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी केवळ तीन कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. सर्वाधिक तेजी ट्रेंट, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये दिसून आली. तर, सर्वाधिक घसरण इटरनल, एअरटेल, भेलच्या शेअरमध्ये दिसून आली.

बीएसईवर आज 4342 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1727 शेअर तेजीसह बंद झाले. तर,2447 शेअरमध्ये घसरण झाली. 158 शेअरमध्ये कोणताही घसरण झाली नाही. 75 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 94 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!