Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MNS News: “मैं मराठी नहीं बोलूंगा, जो करना हैं करो”; कर्मचाऱ्याची अरेरावी; मनसेचा बँक ऑफ महाराष्ट्रला दणका

MNS News: “मैं मराठी नहीं बोलूंगा, जो करना हैं करो”; कर्मचाऱ्याची अरेरावी; मनसेचा बँक ऑफ महाराष्ट्रला दणका

MNS News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा चांगलाच गाजल्याचे म्हटले जात आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. बाहेरून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांनी मराठीबाबत चुकीचे बोलणे किंवा केलेली अरेरावी, दादागिरीला मनसेने आपल्या स्टाइलने उत्तर दिले आहे. असाच एक प्रसंग पुन्हा एकदा समोर आला आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मनसेने चांगलाच दणका दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या माहीम शाखेत ग्राहकांशी उद्धट बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारणा करायला गेले असता, मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी अरेरावीची भाषा कर्मचाऱ्याकडून करण्यात आली. मनसे चिटणीस अनिश खंडागळे यांची बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर यांच्याकडे तत्काळ माफीनामा आणि ट्रान्सफर करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. यानंतर मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

मैं मराठी नहीं बोलूंगा, जो करना हैं करो

मराठी न बोलण्यावरून अनिश खंडागळे यांनी माहीम शाखेतील कर्मचाऱ्याला विचारणा केली. तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही का, नसेल तर का बोलता येत नाही, असा प्रश्न अनिश खंडागळे यांनी केल्यावर बँकेतील कर्मचाऱ्याने नकारार्थी उत्तर दिले. यावरून तुम्ही मुंबईत काम करता, मराठी बोलता आलेच पाहिजे, असे खंडागळे यांनी ठणकावून सांगितले. तसेच नोकरी कुठे करता, या प्रश्नावर मला हिंदी येते. मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करतो. ही सरकारी बँक आहे. राष्ट्रीयकृत बँक आहे, असे उद्धट उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी शिकावी लागेल, असे खंडागळे यांनी निक्षून सांगितले. तरीही सदर कर्मचारी नकारार्थीच उत्तर देत होता.

दरम्यान, एक मराठी माणूस बँक ऑफ महाराष्ट्र येथे कर्ज घेण्यासाठी गेला होता. त्या मराठी माणसाला या कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिली. त्यांच्यावर दादागिरी केली. या कर्मचाऱ्यांची भाषा उद्धट आहे. मराठी बोलण्यास सांगितल्यावर सरळ मराठी बोलणार नाही, अशी उत्तरे देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काय होते, हे आता आम्ही यांना दाखवून देतो, असा इशाराही खंडागळे यांनी यावेळी दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!