मुंबई : सध्या अनेक अर्थविषयक बाबींच्या पहिल्या तिमाहीची कामगिरी समोर आली आहे. त्यातच आता भारतीय दूरसंचार क्षेत्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पहिल्या तिमाहीत स्थिर कामगिरी नोंदवली आहे. एका अहवालानुसार, या काळात ग्राहकांच्या संख्येत स्थिर वाढ झाली आणि 5G नेटवर्कच्या विस्तारावर काम सुरू राहिले.
रिलायन्स जिओने सर्वाधिक 99 लाख ग्राहक जोडले असे म्हटले आहे. यामुळे या कंपनीची ग्राहकसंख्या 498.1 दशलक्ष झाली. याशिवाय, भारती एअरटेलने त्यांच्या भारतीय वायरलेस व्यवसायात 12 लाख ग्राहक जोडले. यामध्ये 39 लाख स्मार्टफोनचा समावेश होता. यामुळे त्यांचा 5G वापरकर्तासंख्या 152 दशलक्ष झाली. तर, व्होडाफोन-आयडिया अर्थात व्हीआयला पाच लाख ग्राहकांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला. यामुळे त्यांचा 4G ग्राहकसंख्या एक लाख झाली. त्यांचा 4G/5G ग्राहकसंख्या 127.4 दशलक्ष राहिली.
दरम्यान, स्मार्टफोन वापर आणि पोस्टपेड अपग्रेडमध्ये वाढ झाल्यामुळे एअरटेलने दरमहा २५० रुपये दरमहा अव्वल स्थान कायम राखले आहे, जे तिमाही-दर-तिमाहीत २ टक्क्यांनी वाढले आहे. जिओचा एआरपीयू १.३ टक्क्यांनी वाढून २०९ रुपये दरमहा झाला आहे. याशिवाय, व्होडाफोन-आयडियाचा एआरपीयू मागील तिमाहीत १६४ रुपयांवरून १६५ रुपयांवर पोहोचला आहे, जो ग्राहकांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा दर्शवितो.
तसेच, व्होडाफोन-आयडियाने मुंबई, दिल्ली, चंदीगड आणि पटना येथे 5G सेवांचा विस्तार केला आहे आणि ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व 17 स्पेक्ट्रम सर्कलमध्ये ते पोहोचवण्याची योजना आखल्याचे समोर आले आहे.


