Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रिलायन्सचे गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’; एअरटेलनेही दिला काहीसा दिलासा

रिलायन्सचे गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’; एअरटेलनेही दिला काहीसा दिलासा

मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. गेला आठवडा शेअर बाजारासाठी संमिश्र ठरला. कधी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली, तर कधी ते कोसळताना दिसून आले. एकूणच, बेंचमार्क सेन्सेक्समध्ये ६६९ अंकांची वाढ झाली. देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे बाजारमूल्य लक्षणीयरीत्या वाढले.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील गुंतवणूकदारांनी फक्त पाच दिवसांत ३६००० कोटींपेक्षा जास्त कमावले. गेल्या आठवड्यात, सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात एकत्रितपणे १.२८ लाख कोटींपेक्षा जास्त वाढ झाली. सर्वात जास्त वाढ भारती एअरटेल आणि रिलायन्स (RIL) यांना झाली. HDFC बँक, TCS, SBI, इन्फोसिस आणि HUL यांनाही फायदा झाला. दरम्यान, बजाज फायनान्स, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) आणि ICICI बँकेचे बाजारमूल्य घसरले.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच जोरदार वाढ झाली आणि त्यांनी ट्रेडिंग दरम्यान १५५७.८० या ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले. शुक्रवारी, शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, ते थोडेसे घसरून १५४३ वर बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल या पाच ट्रेडिंग दिवसांत २०.९२ लाख कोटींवर वाढले आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी तब्बल ३६,६७३ कोटी कमावले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!