मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर अद्यापही चर्चा सुरुच आहे. हा चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. त्याने अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाबद्दल एक गंभीर दावा करण्यात आला आहे. एका लेखकाने आदित्य धरवर ‘धुरंधर २’ ची स्क्रीप्ट चोरल्याचा आरोप केला आहे.
चित्रपट निर्माते संतोष कुमार आर. एस. यांनी याबाबत दावा केला आहे. ‘धुरंधर २’ ची स्क्रीप्ट त्यांनी लिहिली होती. त्यांना हा चित्रपट आदित्य रॉय कपूरसोबत बनवायचा होता, पण आदित्य धरने त्यांची स्क्रीप्ट चोरून ‘धुरंधर २’ बनवला. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबद्दलही सांगितले आहे. ‘धुरंधर २’ चित्रपटाची स्क्रीप्ट त्यांच्या २०२३ च्या पटकथेवर आधारित आहे. त्यांच्याकडे स्क्रीनरायटर्स असोसिएशनमधील नोंदणीसह पुरावे आहेत. ते आता कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे. ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, चित्रपट आणि त्याच्या पटकथेत बरेच साम्य आहे.
तुम्ही सर्वांनी कदाचित ‘धुरंधर २’ पाहिला असेल. तो सर्वत्र खूप चांगली कामगिरी करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, ती माझी स्वतःची पटकथा आणि कथा होती. मी ती २०२३ मध्ये खूप प्रयत्नांनी लिहिली होती. मी ती अनेक कंपन्यांना सादर केली कारण मला सांगण्यात आले होते की, जर मला चित्रपटात मोठे स्टार्स घ्यायचे असतील, तर मला एका कॉर्पोरेट संस्थेच्या पाठिंब्याची गरज आहे, असेही त्याने म्हटले.


