Today बुधवार, 29th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्मिता पाटील यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत; प्रसूतीदरम्यान झाला होता मृत्यू

स्मिता पाटील यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत; प्रसूतीदरम्यान झाला होता मृत्यू

मुंबई : स्मिता पाटील यांची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यांनी बॉलिवूडला ‘मंडी’, ‘अर्थ’ आणि ‘अर्ध सत्य’ यांसारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. मात्र, मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर काही दिवसांतच वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. स्मिता यांना एका विवाहित स्त्रीप्रमाणे निरोप हवा होता. त्या जिवंत असताना, त्यांनी ही गोष्ट त्यांच्या आईला आणि मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांना वारंवार सांगितली होती.

मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी एका यूट्यूब चॅनलवर पूजा सावंत यांची मुलाखत घेतली आणि स्मिता यांचा अखेरचा मेकअप कसा केला हे सांगितले. स्मिता पाटील अनेकदा म्हणायच्या, ‘मला एका विवाहित स्त्रीप्रमाणे निरोप द्या.’ मी तिला असं बोलू नकोस म्हणून ओरडायचो. ती तिच्या आईलाही तेच सांगायची आणि तिची आईसुद्धा त्याला ओरडायची. स्मिताचा अंतिम मेकअप करण्यापूर्वी आपले डोळे कसे पाणावले होते, हे दीपकने सांगितले. तिच्या शेवटच्या दिवसाची आठवण सांगताना त्यांनी म्हटले की, तिच्या मृत्यूनंतर तिची बहीण शिकागोहून येत होती आणि तिला पोहोचायला २-३ दिवस लागले. या काळात तिचे पार्थिव बर्फात ठेवण्यात आले होते आणि ते सुजले होते.

स्मिता पाटील यांनी १९८३ मध्ये अभिनेते राज बब्बर यांच्याशी लग्न केले आणि प्रतीक बब्बर याला जन्म दिला. मात्र, १३ डिसेंबर १९८६ रोजी प्रसूतीदरम्यान त्यांचे निधन झाले. यानंतर राज बब्बर त्यांच्या पहिल्या पत्नी नादिरा यांच्यासोबत राहू लागले. नादिरा आणि राज बब्बर यांचे लग्न १९७५ मध्ये झाले होते. त्यांना आर्या बब्बर आणि जुही बब्बर ही दोन मुले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!