मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने तीन मुलांना जन्म दिला. ती आयव्हीएफद्वारे आई बनली. फराहने तिच्या गर्भधारणा आणि मातृत्वाच्या प्रवासाबद्दल अनेकदा सांगितले आहे. तिघांची आई झाल्यानंतर तिला येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले आहे. डॉक्टरांनी एक कमी मूल जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. मात्र, हे घडून आले नाही. फराह यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाला दिला.
फराह खानने खुलासा केला की, तिने आणि तिचे पती शिरीष कुंदर यांनी तिघांची अपेक्षा असल्याचे कळण्यापूर्वीच त्यांच्या मुलांची नावे आधीच ठरवली होती. फराहने म्हटले की, “शिश कुंदर आणि मी आधीच मुलांबद्दल बोलू लागलो होतो. आम्ही त्यांची नावे कशी ठेवायची आणि आमची मुले कशी असतील यावर चर्चा केली. डॉक्टरांनी मला फोन केला तेव्हा मला १०० टक्के खात्री होती की मी गर्भवती आहे. डॉक्टरांनी मला फोनवर सांगितले, ‘फराह, ऐक, आता तू शांत राहायचे आहे. तू गर्भवती आहेस, पण आशा सोडू नकोस. तुला अनेक मुले होत आहेत”.
फराहने म्हटले की, तिच्या वाढत्या वयामुळे एकापेक्षा जास्त गर्भधारणा करणे खूप धोकादायक आहे. तिच्या डॉक्टरांनी तिला तीनपैकी एका बाळाची संख्या कमी करण्याचा सल्ला दिला, कारण तिच्या वयामुळे तिला अनेक गर्भधारणेचा धोका निर्माण होऊ शकतो. तीन बाळ जन्माला आल्यामुळे एक बाळ खूप लहान असू शकते. पण फराहने तिन्ही बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि २००८ मध्ये ती तीन निरोगी मुलांची आई बनली.


