महाराष्ट्र जागरण डेस्क: ‘सलाकार’ या स्पाय थ्रिलर सिरींजचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला, जो एका गुप्त दुनियेची झलक दाखवतो. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले की, तिचे पात्र केवळ भावनिकच नाही तर धाडसी, गुंतागुंतीचे आणि मजबूत देखील आहे. मौनी म्हणाली, “ही माझी आतापर्यंतची सर्वात भावनिक भूमिका आहे. माझे पात्र केवळ धाडसीच नाही तर त्यात अनेक गुंतागुंती आहेत; ती आतून गोंधळलेली आहे आणि खूप मजबूत देखील आहे.
ती प्रत्येक निर्णय तिच्या भूतकाळातील वेदना आणि अनुभवांमधून घेते. ट्रेलरमध्ये कथेची फक्त झलक दिसते, पण त्यात अनेक पैलू आहेत. मला आनंद आणि अभिमान आहे की मी अशा प्रकल्पाचा भाग आहे ,जो ही कथा खोलवर सांगण्याचे धाडस करतो.” ‘सलाकार’ची कथा वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे. हे तुम्हाला अशा जगात घेऊन जाते जिथे निष्ठा मौल्यवान आहे, शांत राहणे म्हणजे जीव वाचवण्यासारखे आहे आणि एखाद्या व्यक्तीचे जुने ध्येय देशाचे भविष्य ठरवू शकते. ही मालिका फारुक कबीर यांनी दिग्दर्शित केली आहे.


