मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत. ३७ वर्षांच्या या नात्याला अडचणीत पाहून सर्वांनाच धक्का बसला. मात्र, आता दोघांनीही घटस्फोटाच्या अफवांना नकार दिला. यावरूनच आता ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि चित्रपट क्षेत्रातील नामावंत हनीफ झवेरी यांनी विधान केले.
हनीफ झवेरी यांनी या जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत होणारी चर्चा प्रसिद्धी मिळवण्याचे एक साधन असू शकते. मला विचित्र वाटणारी पहिली गोष्ट म्हणजे गोविंदा त्याचा पुतण्या कृष्णा अभिषेकशी बोलत नाही. कृष्णाने मीडियासमोर कौटुंबिक बाब उपस्थित केल्यापासून अनेक वर्षे झाली आहेत. गोविंदाला वैयक्तिक मुद्दे सार्वजनिक करायला आवडत नाहीत. पण आता सर्व काही त्याच्या पत्नीच्या माध्यमातून सांगितले जात आहे. मग हे सर्व कशासाठी आहे?
तसेच ते म्हणाले, ‘मला वाटत नाही की त्यांच्या वैवाहिक जीवनात काही दुरावा आहे. त्यांचे एकत्र चांगले जीवन आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले वाढवले आहे. लोकांना असेही वाटते की, सुनीताला हे सर्व सांगण्याची गरज नाही. हे सर्व गोविंदाला पुन्हा मीडियामध्ये आणण्यासाठी केले जात आहे. कारण गोविंदा बराच काळ प्रसिद्धीपासून दूर आहे. तो चित्रपट किंवा राजकारणात फारसा सक्रिय नाही. म्हणून केले असावे’.


