Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Miss World 202कोण आहे नंदिनी गुप्ता? जाणून घ्या राजस्थानमधील कोटा ते मिस वर्ल्ड स्टेजपर्यंतचा प्रवास….

Miss World 202कोण आहे नंदिनी गुप्ता? जाणून घ्या राजस्थानमधील कोटा ते मिस वर्ल्ड स्टेजपर्यंतचा प्रवास….

मुंबई: ७२ व्या मिस वर्ल्डचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच ३१ मे रोजी तेलंगणातील हैदराबाद येथील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष नंदिनी गुप्तावर आहे, जी मिस वर्ल्ड २०२५ च्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. संपूर्ण देशाला वाटते की, भारताची मुलगी नंदिनी गुप्ता हिच्या डोक्यावर मिस वर्ल्ड २०२५ चा मुकुट सजला जावा. जेणेकरून आठ वर्षांनी भारताला एक नवीन मिस वर्ल्ड मिळेल. चला जाणून घेऊया कोण आहे नंदिनी गुप्ता, जिच्यावर संपूर्ण देशाच्या आशा टिकल्या आहेत.

राजस्थानमधील कोटा येथे जन्म
नंदिनी गुप्ताचा जन्म १३ सप्टेंबर २००३ रोजी राजस्थानमधील कोटा येथे सुमित गुप्ता आणि रेखा गुप्ता यांच्या पोटी झाला. कोटा येथील सेंट पॉल सीनियर सेकंडरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करणारी नंदिनी मुंबईतील लाला लजपत राय कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेत आहे.

वयाच्या १९ व्या वर्षी मिस इंडियाचा किताब
२१ वर्षीय नंदिनी गुप्तावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. भारताला सातवे मिस वर्ल्ड किताब मिळवून देण्यापासून ती फक्त एक पाऊल दूर आहे. नंदिनीने यापूर्वी २०२३ मध्ये फेमिना मिस राजस्थान आणि त्याचवर्षी अवघ्या १९ व्या वर्षी फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे.

नंदिनीला वयाच्या १० व्या वर्षापासून व्हायचे होते मिस इंडिया
नंदिनीला वयाच्या १० व्या वर्षापासून मिस इंडिया व्हायचे होते. फेमिना मिस वर्ल्ड २०२३ मध्ये तिला विचारण्यात आले की, तिला जग बदलायचे आहे की स्वतःला बदलायचे आहे. तर नंदिनीने तिच्या उत्तरात म्हटले होते की, ”मला वाटते की मी स्वतःला बदलेन कारण, ज्याप्रमाणे कौतुक घरातून येते आणि दानधर्म घरातून सुरू होतो, त्याचप्रमाणे बदल देखील आतून येतो. म्हणून जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद असेल तर तुम्ही जग बदलू शकता.”

इंस्टाग्रामवर १.३७K फॉलोअर्स आहेत
नंदिनी गुप्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे मॉडेलिंगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते. नंदिनीच्या इंस्टाग्रामवरील अधिकृत अकाउंटवर १ लाखाहून अधिक म्हणजेच १.३७K फॉलोअर्स आहेत.

आतापर्यंत भारताने सहा वेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकला
नंदिनी गुप्ता हिच्यापुर्वी भारताने सहा वेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे. आता नंदिनीकडून अशी अपेक्षा आहे की, ती सातव्यांदा मिस वर्ल्डचा मुकुट भारतात आणेल. मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या सहा भारतीय सुंदरींमध्ये रीता फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) आणि मानुषी छिल्लर (२०१७) यांचा समावेश आहे. आता आठ वर्षांनंतर, पुन्हा एकदा नंदिनी गुप्तावर आशा टेकल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!