मेष: उत्साहाने कार्यरत राहून आजची सर्व कामे पूर्ण करणार आहात. काहीजण आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतील. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : दैनंदिन कामास विनाकारण विलंब लागेल. काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहील. आज आपला आराम करण्याचा मूड राहील. काहीना कामे नकोशी होतील. प्रवास आज नकोत.
मिथुन : प्रियजनांशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. काहींना शेअर्स मध्ये फायदा होईल.
कर्क: उत्साही रहाल. सार्वजनिक कामात तुमचा पुढाकार राहील. काहींना मानसन्मानाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
सिंह : काहींना भाग्यकारक अनुभव येतील. मनोबल उत्तम राहील. उचित मार्गदर्शन लाभेल. गुरुजांची तुमच्यावर कृपा राहील. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. अनावश्यक वादविवाद टाळ्ळावेत.
तुळ : दैनदिन कामात सुयश लाभेल. आज आपल्याला अनेक बाबतीत उत्साही वाटणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक : आज आपल्याला एखाद्या बाबतीत अनावश्यक मनस्ताप संभवतो. आज आपण शांत व संयमी रहावे. कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा व अतिधाडसीपणा टाळावा.
धनु : बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.
मकर : आनंदी व आशावादी रहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. सार्वजनिक क्षेत्रात काहींना मानसन्मानाचे योग येतील. उत्साह रहाल.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना आज अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन: मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही रहाल. सध्या आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष क्तीवर भर द्यावा, प्रवास सुखकर होतील. कामे मार्गी लागतील.


