महाराष्ट्र जागरण डेस्क: दैनिक राशिभविष्य हे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे दैनंदिन अंदाज तपशीलवार वर्णन केले आहे. चला, तर मग जाणून घेऊयात आजचे राशिभविष्य…
मेष: मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत रहाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.
वृषभ : कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. दैनंदिन तसेच इतर रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात.
कर्क : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. अनावश्यक वादविवाद टाळावेत. वेळ वाया जाईल.
सिंह : आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. बौद्धिक अंदाज अचूक ठरतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.
कन्या: आज आपला सर्वत्र प्रभाव असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
तूळ : तुमचे मनोबल वाढेल. गेले दोन दिवस असणाऱ्या मानसिक अस्वस्थतेमुळे रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. गुरुकृपा लाभेल. गुरुजनांचे उचित मार्गदर्शन लाभेल.
वृश्चिक : मनोबल कमी राहील. तुम्हाला आज एखादी चिंता सतावणार आहे. भावनिक दडपण राहील. स्वास्थ्य कमी लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. प्रवास आज नकोत.
धनु : उत्साही रहाल. तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. अनेक कामे तुम्ही मार्गी लावणार आहात. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
मकर : खर्च वाढणार आहेत. आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक नैराश्य जाणवेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी, आज कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा नको.
कुंभ: तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. प्रवास सुखकर होतील. प्रियजन व जुने मित्रमैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आज आशावादी राहणार आहात. नोकरी व व्यवसायातील अपेक्षित कामे पूर्ण होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.


