Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Actor Pankaj Dheer Passed Away: महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Actor Pankaj Dheer Passed Away: महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Actor Pankaj Dheer Passed Away: बीआर चोप्रा यांची ‘महाभारत’ मालीका चांगलीच गाजली. त्यात कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. पंकज धीर हे 68 वर्षांचे होते. पंकज धीर यांनी आज बुधवारी, १५ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांचे जुने मित्र अमित बहल यांनी इंडिया टुडेशी बोलताना त्यांच्या निधनाची माहिती दिली.

पंकज यांना कर्करोग झाला होता. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. कर्करोगामुळे त्याची प्रकृतीही खालवली होती. त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण पंकज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज त्यांचे निधन झाले.

पंकज धीर हे त्यांचा उत्तम अभिनय व भारदस्त आवाजासाठी ओळखले जायचे. पंकज यांनी ‘सडक’, ‘सोल्जर’ आणि ‘बादशाह’ यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांना खरी लोकप्रियता १९८८ च्या ऐतिहासिक ‘महाभारत’ मालिकेमुळे मिळाली. ‘महाभारत’मधील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकज धीर यांना प्रसिद्धी मिळाली.

पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर हा देखील एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निकितनच्याजोधा अकबर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील त्याच्या भूमिकांसाठी विशेष ओळखला जातो.

अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज (१५ ऑक्टोबर) मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार लवकरच केले जातील. त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!