Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Asim Sarode: मोठी बातमी! अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द

Asim Sarode: मोठी बातमी! अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द

पुणे: पुण्यातील प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत अ‍ॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय दिला.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, असीम सरोदे यांनी काही महिन्यांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यांमुळे न्यायसंस्थेचा अपमान आणि न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एका तक्रारदाराने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने १९ मार्च २०२४ रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारल्याने बार कौन्सिलने अखेर त्यांच्या वकिलीच्या सनदेला तीन महिन्यांची स्थगिती दिली.

समितीचा अहवाल  

अ‍ॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचा व्हिडिओ आणि ट्रान्सक्रिप्ट तपासला. त्यात सरोदे यांनी “राज्यपाल फालतू आहेत” आणि “न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे” असे विधान केलेले स्पष्ट दिसत असल्याचे नमूद करण्यात आले. समितीने निरीक्षणात म्हटले आहे की, अशा विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दलचा विश्वास कमी होतो. वकील हा ‘Officer of the Court’ असल्याने त्याच्यावर न्यायसंस्थेचा सन्मान राखण्याची जबाबदारी असते.

असीम सरोदे यांचे प्रत्युत्तर

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असीम सरोदे म्हणाले की, मी न्यायालयाचा किंवा कोणत्याही संविधानिक पदाचा अपमान केलेला नाही. माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. ‘फालतू’ हा शब्द मी सर्वसामान्य अर्थाने वापरला, अपमानार्थ नव्हे. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. असीम सरोदे हे सध्या शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीन सुनावणीतील वकिलांपैकी एक आहेत. मात्र आता त्यांची सनद रद्द झाल्याने, पुढील तीन महिन्यांसाठी त्यांना न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!