Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Dashkriya Vidhi: मोठी बातमी! अजितदादांच्या दशक्रिया विधी होणार नाही; श्रीनिवास पवारांनी सांगितलं कारण

Ajit Pawar Dashkriya Vidhi: मोठी बातमी! अजितदादांच्या दशक्रिया विधी होणार नाही; श्रीनिवास पवारांनी सांगितलं कारण

Ajit Pawar Dashkriya Vidhi: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी जाहीर केले आहे की, परंपरेनुसार होणारा ‘दशक्रिया विधी’ किंवा १३ व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

कौटुंबिक निर्णय: विधी आटोपले
अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या अंत्यविधीच्या पुढील विधींच्या प्रतीक्षेत होता. मात्र, श्रीनिवास पवार यांनी यामागची स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक असलेले सर्व धार्मिक विधी पार पडले आहेत. यामुळे ६ फेब्रुवारीला होणारा दहाव्याचा विधी किंवा उत्तरकार्याचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही. हा निर्णय पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे घेतला असून, याबाबत सुनेत्रा पवार किंवा पार्थ-जय पवार यांनी स्वतंत्रपणे कोणतेही भाष्य केलेले नाही.

हेही वाचा – ‘अजित पवार अपघातामागे काही षडयंत्र असेल, तर …’, अजित पवार विमान दुर्घटनेवर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा
एककीडे पवार कुटुंबीय या दुःखातून सावरत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसदार’ कोण, यावर खलबतं सुरू झाली आहेत. पक्षातील बहुतांश आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान हाती घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले होते, परंतु त्यांनी स्वतः या बातम्यांचे खंडन केले आहे. “अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!