Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Creative Engine Expo 2026: पुण्यात भरणार ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026’; भारताच्या अब्जावधी रुपयांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे उलगडणार भवितव्य

Creative Engine Expo 2026: पुण्यात भरणार ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026’; भारताच्या अब्जावधी रुपयांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे उलगडणार भवितव्य

Creative Engine Expo 2026: बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि डिजिटल कौशल्य यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी मेंदूतील कल्पनाशक्तीवर आधारित ‘ऑरेंज इकॉनॉमी’ अथवा ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’ ही भारताच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा ठरत आहे. याच संकल्पनेवर आधारित ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026’चे आयोजन येत्या 30 आणि 31 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य आयोजक ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाईन’चे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या परिषदेला माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत आणि IICT चे संचालक आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

भविष्यातील अब्जावधी रुपयांचे अर्थकारण
एक्स्पो विषयी अधिक माहिती देताना संतोष रासकर म्हणाले की, हा एक्स्पो केवळ कला, ॲनिमेशन किंवा तंत्रज्ञानाचा मेळावा नसून भारतातील भविष्यातील अब्जावधी रुपयांच्या क्रिएटिव्ह अर्थकारणाची झलक ठरणार आहे. जगभरात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामुळे रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासासाठी नवे मार्ग खुले होत आहेत. सध्या जागतिक स्तरावर ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा वाटा GDP मध्ये सातत्याने वाढत असून ॲनिमेशन, गेमिंग, VFX, डिजिटल डिझाईन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित क्रिएटिव्ह सोल्यूशन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे केंद्र बनवण्याचे व्हिजन मांडले असून त्यासाठी विविध धोरणात्मक पावले उचलली जात आहेत.

‘पुणे-मुंबई AVGC-XR कॉरिडॉर’ ठरणार गेमचेंजर
IICT चे डायरेक्टर आशिष कुलकर्णी यांनी माहिती दिली की, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला ‘पुणे-मुंबई AVGC-XR कॉरिडॉर’ हा या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. AVGC-XR म्हणजे Animation, Visual Effects, Gaming, Comics आणि Extended Reality या क्षेत्रांचा समावेश असलेला हा कॉरिडॉर पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडून सर्जनशील उद्योगांचे नवे केंद्र निर्माण करणार आहे. शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा मजबूत पाया असलेल्या पुणे शहराला यामुळे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

देश-विदेशातील 35 नामांकित कंपन्यांचा सहभाग
या भव्य एक्स्पोमध्ये देश-विदेशातील सुमारे 35 नामांकित कंपन्या आणि स्टुडिओ सहभागी होणार आहेत. यामध्ये असेंबलाज स्टुडिओ, रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ, रेड चिलीज VFX, एनव्हिजन स्टुडिओ, कंपनी 3, NY VFXWala, निली गेम्स, गेमडोरा, रॅम्पन्ट स्टुडिओ, हायटेक, डब्ल्युआरसी, विजडम ग्राफिक्स यांसारख्या बलाढ्य कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या केवळ मनोरंजन क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स, आर्किटेक्चरल व्हिज्युअलायझेशन, वैद्यकीय 3D सिम्युलेशन, डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सुरक्षेसारख्या प्रगत क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत.

सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम
भारतातील पुढील पिढी कोणत्या नव्या डिजिटल आणि सर्जनशील जगात प्रवेश करणार आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा एक्स्पो ठरणार आहे. याविषयी बोलताना प्रदीप रावत म्हणाले की, ऑरेंज इकॉनॉमीसाठी मोठ्या भांडवलाची किंवा प्रचंड जागेची आवश्यकता नसते. एक संगणक, इंटरनेट आणि सर्जनशील विचार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक देखील जागतिक स्तरावर काम करू शकतो. महिलांचा वाढता सहभाग आणि स्टार्टअप संस्कृतीमुळे ही इकॉनॉमी सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरेल. या प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णपणे विनाव्यत्यय आणि मोफत (विनामूल्य) असून नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, कलाकार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!