Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निर्लज्जपणाचा कळस! भर कोर्टात सुनावणीआधी वकिलानं महिलेला केलं ‘किस’; सगळा प्रकार गेला लाईव्ह

निर्लज्जपणाचा कळस! भर कोर्टात सुनावणीआधी वकिलानं महिलेला केलं ‘किस’; सगळा प्रकार गेला लाईव्ह

Delhi High Court Lawyer Viral Video: दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एक धक्कादायकटना घडली. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने महिलेला चक्क किस केलं. सुनावणी त्या महिलेबाबत होती का? हे अजून समोर आलेले नाही. ही घटना मंगळवारी घडली, ऑनलाईन सुनावणी सुरू होण्यासाठी काही वेळ बाकी होता. सर्व लोक न्यायमूर्ती येण्याची वाट पाहत असताना सदर प्रकार घडला.

सुनावणी आधी काय होते?

व्हिडीओमध्ये दिसत की, वकील आपल्या कार्यालयात कोट घालून बसला . वकील सुनावणीसाठी तयार असतानाच एक महिला अचानक व्हिडीओमध्ये येते. तेव्हा वकील त्या महिलेच्या हाताला पकडून तिला स्वतःजवळ खेचण्याचा प्रयत्न करतात. सदर महिला जवळ येण्यास तयार नसते, तेवढ्यात वकिल तिला खेचून तिच्या गालावर किस करत. यानंतर लगेचच महिला मागे हटते आणि निघून जाते. सदर घटनेमधील वकील आणि महिलेची ओळख उघड करण्यात आलेली नाही. तसेच हा व्हिडीओ कोणत्या उद्देशाने रेकॉर्ड करण्यात आला, याचीही माहिती बाहेर आलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची चर्चा

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी वकिलाच्या वर्तनाचा निषेध केला आहे. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, असे एका युजरने लिहिले. दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणी आजकाल करमणुकीचा विषय बनली आहे. गंभीर निकालापासून ते कोर्टरूममधील नाट्य, असे दररोज काहीना काही घडत आहे. जर हेच सर्व करायचे होते, तर वकील बनण्याची गरज तरी काय होती?, अशी कमेंट एका युजरने केली आहे. न्याय कदाचित आंधळा असेल पण आता तो म्यूटही असतो आणि चुकून त्याचा कॅमेराही सुरू असतो, अशी मजेशीर प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!