Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

खेकड्यांनी पॅकेजलाही भोकं पाडली का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

खेकड्यांनी पॅकेजलाही भोकं पाडली का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्योगपती मित्रांचं कर्ज माफ केलं जातं, ते आरामात परदेशात असतात. पण शेतकरी आपली शेती, आपला जीव गमावतो तरी देश सोडत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

खेकड्यांनी पॅकेजलाही भोकं पाडली का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजवर उद्धव ठाकरेंनी उपरोधिक टीका केली. मुख्यमंत्र्यांनी ज्या पॅकेजची घोषणा केली, त्या पॅकेजला खेकड्यांनी भोकं पाडली का? जशी धरणांना भोकं पाडली होती, असे म्हणत ठाकरेंनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता टोलाही लगावला.

हेही वाचा –“आम्हाला निवडून यायचे होते म्हणून…”, शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात आयोजित सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या काळात चुकून काही जणांना मंत्री केलं होतं, पण पिक विमा वेळेत मिळाला नाही, तर शेतकरी तुमच्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवरही ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी पंचांग पाहून शुभ मुहूर्त ठरवला आहे का? जूनच्या शेवटी म्हणतात कर्जमाफी होईल, पण तोपर्यंत शेतकरी चालेल कसा? दोन हंगामांचं नुकसान झालं, तरी मदत कुठं आहे? असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

मत चोरी नाही, मत दरोडा आहे

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, हे मत चोरी नाही, मतांवर दरोडा आहे. राहुल गांधींनी दाखवलेलं उदाहरण बघा एका महिलेचं नाव २२ ठिकाणी आहे, ती ब्राझीलमधली आहे. मग भारतीय जनता पार्टीची दुबार नोंदणी झाली का? एक ‘इंडियन जनता पार्टी’ आणि एक ‘ब्राझिलियन जनता पार्टी’? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांच्या मदतीचं पॅकेज कागदावरच

राज्यातील अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजवरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरले. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले, पण हजारो शेतकऱ्यांना अजून मदतीची प्रतीक्षा आहे. सरकार सत्तेच्या मस्तीत फिरतंय, पण शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या गेल्या आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!