Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजणार! आजपासून लागू होऊ शकते आचारसंहिता

महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजणार! आजपासून लागू होऊ शकते आचारसंहिता

Local Body Election: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आगामी काही दिवसांत मोठी हालचाल घडण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोग निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यभर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयानंतर 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात होईल.

विरोधकांची आक्षेपार्ह भूमिका

राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार याद्यांतील विसंगती दूर न करता निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे. मात्र आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण कराव्या लागणार असल्याने, निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे. मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या असून आयोगाने तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यासाठी अधिसूचना तयार ठेवली आहे.

तीन टप्प्यांत होणार निवडणुका

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडतील, असा संकेत मिळाला आहे.

  • पहिला टप्पा: 289 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होईल. हा टप्पा सुमारे 21 दिवसांचा असेल.
  • दुसरा टप्पा: 32 जिल्हा परिषदा आणि 331 पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. हा टप्पा सुमारे 30 ते 35 दिवस चालेल.
  • तिसरा टप्पा: अखेरच्या टप्प्यात 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडतील. हा कार्यक्रम साधारणपणे 30 दिवस चालण्याची शक्यता आहे.

आरक्षण जाहीर, आता वेळापत्रकाची प्रतीक्षा

नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाची घोषणा आधीच झाली असून महापालिकांच्या आरक्षणाची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल. त्यामुळे आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सूत्रांनुसार, आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत आयोग निवडणुकीची घोषणा करू शकतो, आणि याच क्षणापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आयोग सुरुवातीला 289 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करेल. ईव्हीएमची चाचणी, मतदार यादी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!