Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Raut: ‘पहिले धोतर नीट नेसायला शिका, मग आम्हाला अक्कल शिकवा’; संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींवर घणाघात

Sanjay Raut: ‘पहिले धोतर नीट नेसायला शिका, मग आम्हाला अक्कल शिकवा’; संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींवर घणाघात

Sanjay Raut: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीत आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. राज ठाकरेंवर कोश्यारींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राऊतांनी अत्यंत तिखट आणि आक्रमक पवित्रा घेतला. “ज्याला स्वतःचे धोतर नीट नेसता येत नाही, त्याने आम्हाला शहाणपण शिकवू नये,” अशा शब्दांत राऊतांनी कोश्यारींचा जाहीर निषेध करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

वादाची ठिणगी आणि कोश्यारींचा सल्ला
या वादाची सुरुवात राज ठाकरे यांनी आरएसएस सरसंचालक मोहन भागवत यांना दिलेल्या सल्ल्याने झाली होती. ‘राजकीय विषयांवर रटाळ प्रवचने देऊ नका,’ असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ जाण्याचा सल्ला दिला होता. “राज ठाकरे मोदींना खूप घाबरले आहेत, त्यांनी भीती न बाळगता मोदींच्या कार्याकडे पाहावे,” असे कोश्यारी म्हणाले होते. कोश्यारींच्या याच भूमिकेमुळे संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

‘पद्मभूषण’ आणि बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ
संजय राऊत यांनी केवळ कोश्यारींवरच नव्हे, तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला ‘पद्मभूषण’ देणे, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार असूच शकत नाही, असे राऊत म्हणाले. “आज जर बाळासाहेब असते, तर अशा माणसाला त्यांनी जोड्याने मारले असते,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात विरोधकांच्या डोळ्यात बघून बोलण्याची हिंमत नसल्याचा दावाही त्यांनी राहुल गांधींच्या भाषणाचा संदर्भ देत केला.

हेही वााच – Sanjay Raut : अजित पवारांचा विमान अपघात की राजकीय कट? संजय राऊतांचा गंभीर आरोप; विदर्भातील ‘त्या’ नेत्यावर संशयाची सुई

कोश्यारींची रामाशी तुलना आणि संभाव्य राजकीय संघर्ष
दुसरीकडे, भगतसिंह कोश्यारी यांनी मोदींच्या कार्याची तुलना प्रभू रामाच्या कार्याशी केली होती. राज ठाकरे माझ्या धाकट्या भावासारखे असून त्यांनी केवळ चुकीच्या कामांना घाबरायला हवे, असे त्यांनी नमूद केले होते. मात्र, आता राऊतांनी केलेल्या ‘धोतर’ विधानामुळे हा वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचला असून, येणाऱ्या काळात राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!