Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Govardhan Asrani Died :‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर’ काळाच्या पडद्याआड; असरानी यांची दीर्घ आजारासोबतची झुंज ठरली अपयशी

Govardhan Asrani Died :‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर’ काळाच्या पडद्याआड; असरानी यांची दीर्घ आजारासोबतची झुंज ठरली अपयशी

Govardhan Asrani Passed Away: दिग्गज अभिनेते विनोदी भूमीकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते गोवर्धन असरानी यांच आज निधन झालं. आज सांयकाळी ४ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते दिर्घकाळापासून आजारी होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. शोलेमधली त्यांची जेलरची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आणि कायम स्मरणात राहणारी आहे.

दीर्घकाळापासून चालू होते उपचार

गोवर्धन असरानी यांचे आज 20 नोव्हेंबर रोजी सायकाळी चार वाजता निधन झाले. दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना आरोग्य निधी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिबा यांनी सांगितले आहे. ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा हेच पाहायचे. त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे.

गोवर्धन असरानी यांचे सिनेसृष्टीतील करिअर

गोवर्धन असरानी यांनी अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. 1967 साली त्यांचा गुजराती भाषेतला एक चित्रपट आला होता. त्यांच्या करिअरमधील हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर हरे कांच की गुडीया हा चित्रपट आला. त्यांनी नमक हराम (1973) या चित्रपटात केलेल्या भूमिकेचे फारच कौतुक झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. पुढे कोशीश (1972), बावर्ची (1972), परिचय (1972), अभिमान (1973), मेहबुबा (1976), पलकोंकी छाव मे (1977), दो लडके दोनो कडके (1979), बंदीश (1980) यासारख्या चित्रपटांत काम केले.

असरानी यांनी जो जीता वही सिकंदर (1992), गर्दीश (1993), घरवाली बहरवाली (1995) बडे मियाँ छोटे मियाँ (1998) सारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. त्यानंतर हेरा फेरी (2000), हलचल (2004), गरम मसाला (2005), चुप चुप के (200), भागम भाग (2006), दे दना दान (2009), बोल बच्चन (2012) यासारख्या अलिकडच्या चित्रपटांतही काम केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!