Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Missile Attack On Qatar Gas Plant: इराणचा कतारवर क्षेपणास्त्र हल्ला; भारताचा 20 टक्के वायू पुरवठा ठप्प, वीज अन् इंधन टंचाईची टांगती तलवार

Missile Attack On Qatar Gas Plant: इराणचा कतारवर क्षेपणास्त्र हल्ला; भारताचा 20 टक्के वायू पुरवठा ठप्प, वीज अन् इंधन टंचाईची टांगती तलवार

Missile Attack On Qatar Gas Plant: पूर्वेतील युद्धाचा वणवा आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कतारमधील जगातील सर्वात मोठ्या वायू प्रकल्पावर इराणने केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. या हल्ल्यानंतर कतारकडून होणारी नैसर्गिक वायूची (LNG) निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली असून, भारताचा सुमारे 20 टक्के गॅस पुरवठा अचानक थांबला आहे. यामुळे देशातील वीज निर्मिती आणि औद्योगिक उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

20 टक्के आयात ठप्प
भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजेसाठी कतारवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या ताज्या संकटामुळे भारताच्या गॅस आयातीचे संपूर्ण गणित बिघडले आहे. आकडेवारीनुसार, दररोज येणारा 47.4 MMSCMD (दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्यूबिक मीटर्स) इतका अवाढव्य वायू पुरवठा तांत्रिक कारणास्तव आणि सुरक्षेच्या कारणास्तव थांबला आहे. ‘रास लाफान’ हे कतारचे मुख्य निर्यात केंद्र असल्याने, तिथून भारताकडे येणारे गॅस टँकर्स सध्या समुद्रात अडकून पडले आहेत.

वीज कपात आणि महागाईची टांगती तलवार
गॅसचा पुरवठा घटल्याने केंद्र सरकारने तातडीने आपत्कालीन पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या तुटवड्याचा थेट आणि सर्वात मोठा फटका वीज निर्मिती केंद्रांना बसणार आहे, ज्यामुळे अनेक शहरांत वीज कपातीचे संकट ओढवू शकते. तसेच, खत कारखान्यांना होणारा पुरवठा मर्यादित केल्यास शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. घरगुती गॅस (PNG) आणि वाहनांच्या इंधनाचा (CNG) पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उद्योगांच्या गॅस कोट्यात कपात केली जाऊ शकते, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढून महागाई वाढण्याची चिन्हे आहेत.

पर्यायी मार्गांची शोधाशोध आणि ‘होर्मुझ’चा धोका
इराण-कतार संघर्षाचे केंद्र असलेली ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझ सामुद्रधुनी) सध्या युद्धभूमी बनली आहे. हा मार्ग जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो असुरक्षित झाल्याने भारतासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यासाठी भारताच्या सरकारी तेल कंपन्यांनी आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून तातडीने एलएनजी खरेदी करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. मात्र, जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किमती अचानक वाढल्याने भारतातही इंधनाचे दर कडाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!