Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amravati Crime: अमरावतीत ‘खरात 2.0’! 180 तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मोहम्मद तनवीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Amravati Crime: अमरावतीत ‘खरात 2.0’! 180 तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मोहम्मद तनवीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Amravati Crime: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून अशाच प्रकारचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची (२१ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, आरोपीने जवळपास १८० तरुणींचे लैंगिक शोषण केले असून त्याच्या मोबाईलमध्ये ३५० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तो तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचेही समोर आले आहे.

सायबर विभागाकडून डेटा रिकव्हरी सुरू
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यात अनेक धक्कादायक व्हिडिओ आढळले आहेत. आरोपीने तपासाच्या भीतीने बराच डेटा डिलीट केला होता, जो आता सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचे (Recover) काम सुरू आहे. आरोपीने गेल्या एक वर्षापासून हा काळा धंदा सुरू असल्याची कबुली दिली असून, आतापर्यंत ७ पीडित मुलींची नावे निष्पन्न झाली आहेत. हा व्हिडिओ त्याने इतर कोणाला पाठवला का, याचाही शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर बोंडेंचा संताप
गेल्या तीन दिवसांपासून हे व्हिडिओ व्हायरल होत असतानाही पोलिसांनी स्वतःहून (Sumoto) कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी त्वरित कठोर पावले न उचलल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अशोक खरातने ज्याप्रमाणे महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले, तसाच काहीसा प्रकार इथेही घडल्याचे बोलले जात आहे. खरात प्रकरणाची चौकशी सध्या विशेष पोलीस पथकामार्फत सुरू असून अमरावतीच्या या घटनेने संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!