Mahadev Munde Case: स्वर्गीय महादेव मुंडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शांत राहणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने बाजूला ठेवले पाहिजे. तथापी, सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असून आज त्या स्वतः बीडला जाऊन ज्ञानेश्वरी यांची भेट घेणार आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी 31 जुलै रोजी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठन करण्यात आली होती. ही एसआयटी मागील सुमारे तीन महिन्यांपासून तपास करत आहे आणि अद्याप कोणत्याही आरोपीची पुष्टी झालेली नाही, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी तपास प्रक्रियेतील पारदर्शकता आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध आग्रह
सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही विनंती केली आहे की प्रकरणाच्या चौकशीत कोणालाही अगोदरच ‘क्लीनचिट’ देऊ नये. त्यांनी सुचवले की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र SIT ने तपास करावा, जेणेकरून न्यायप्राप्ती ठोस आणि निष्पक्ष होईल.
केंद्रीय नेत्यांपर्यंत पोहोचवणार माहिती
याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही बाब त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही मांडणार आहेत. महाराष्ट्राच्या एका लेकीला योग्य न्याय मिळावा ही आमची मुख्य मागणी आहे. त्या म्हणाल्या की CDR रिपोर्ट कसा लीक झाला याचेही तपशीलवार चौकशी करावी लागेल आणि जर कोणी दोषी आढळला तर त्याला कठोर शिक्षा व्हावी.


