Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवड हादरले! अविवाहित तरुणीचे घरीच बाळंतपण; उपचाराअभावी माय-लेकीचा करुण अंत

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवड हादरले! अविवाहित तरुणीचे घरीच बाळंतपण; उपचाराअभावी माय-लेकीचा करुण अंत

Pimpri-Chinchwad News: समाजाच्या भीतीपोटी लपवलेले गुपित अखेर एका २२ वर्षीय तरुणी आणि तिच्या नवजात बाळाच्या जिवावर बेतले आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडे नगर परिसरात एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली असून, घरीच प्रसूती झाल्यानंतर योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने माता आणि बालक या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी अविवाहित होती आणि तिने आपले गरोदरपण कुटुंबीयांपासून लपवून ठेवले होते. मंगळवारी (२४ मार्च) सकाळी तिला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि घरातच तिचे बाळंतपण झाले. मात्र, प्रसूतीनंतर तिची प्रकृती कमालीची खालावली. तिला तातडीने रावेतमधील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

दुसरीकडे, नवजात बाळाची प्रकृतीही चिंताजनक असल्याने त्याला वायसीएम (YCM) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काळाचा घाला इतका क्रूर होता की, उपचारादरम्यान सायंकाळी आधी बाळाचा आणि त्यानंतर काही वेळातच मातेचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून चिंचवड पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!