Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Elvish Honey Scam: चिंचुके, खडे आणि आता ‘तुर्की मध’; अशोक खरातचे नवे कारनामे उघड

Elvish Honey Scam: चिंचुके, खडे आणि आता ‘तुर्की मध’; अशोक खरातचे नवे कारनामे उघड

Elvish Honey Scam: तथाकथित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या फसवणुकीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा प्रत्यय देणारे नवनवीन खुलासे पोलीस तपासात होत आहेत. बनावट खडे आणि चिंचुके विकून भाविकांना लुटल्यानंतर, आता खरातने ‘तुर्की मध’ (Turkish Honey) विकून कोट्यवधींचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे ‘एल्विश हनी’चा बनाव?
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमध्ये मिळणारे ‘एल्विश हनी’ आपल्याकडे असल्याचे भासवत असे. हे मध अत्यंत दुर्मिळ असून ते शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी आणि लैंगिक समस्यांवर रामबाण उपाय असल्याचा दावा तो करत असे. एका किलोच्या बाटलीसाठी तो तब्बल ९ लाख रुपये उकळत होता. प्रामुख्याने मोठे उद्योजक आणि राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढून तो या मधाची विक्री करत असे.

पैशांची अफरातफर आणि काळा पैसा
केवळ फसवणूकच नाही, तर या माध्यमातून गोळा झालेला अवाढव्य पैसा आपल्या ट्रस्टच्या नावावर जमा करून खरातने ‘मनी लॉन्डरिंग’ केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. लोकांच्या अंधश्रद्धेचा आणि हतबलतेचा फायदा घेत त्याने आर्थिक गुन्हेगारीचे मोठे साम्राज्य उभे केल्याचे आता स्पष्ट होत आहे.

महिलांचे शोषण आणि अत्याचाराचे सत्र
अशोक खरातचा क्रूर चेहरा केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नाही. तांत्रिक विधी, भविष्य सांगणे किंवा लग्नाचे योग जुळवून देण्याच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सध्या त्याच्यावर ६ गुन्हे दाखल असून नवीन ३ तक्रारींची भर पडली आहे. तक्रारदारांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश असून, खरातने तिच्याशी अत्यंत निंदनीय गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे.

आज न्यायालयीन सुनावणी
अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या प्रकरणातील अधिक धागेदोरे शोधण्यासाठी कोठडी वाढवून मिळण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. खरातच्या या कृष्णकृत्यांमुळे नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!