Rivaba Jadeja Statment On Team India: भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी गुजरात सरकारमधील मंत्री रिवाबा जडेजाच्या एका वक्तव्याने क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. रिवाबाने एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंवर एक असा आरोप लावला ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि खळबळ उडाली. तिने केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतंय. यावर आता फॅन्स पासून एक्सपर्ट्सपर्यंत सर्व आपली प्रतिक्रिया देत आहेत.
रिवाबाचा भारतीय संघावर आरोप
एका कार्यक्रमादरम्यान पती रवींद्र जडेजाच्या प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्धतेचं कौतुक करताना रिवाबाने अचानकपाने भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला. तिने म्हटले की, रवींद्र जडेजा जगातील अनेक देशांमध्ये जसे लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी खेळण्यासाठी जातो. परंतु तरीही तो कोणत्याही चुकीच्या सवयीनं किंवा व्यसनाला बळी पडत नाहीत. त्यानंतर रिवाबाने आश्चर्यकारक आरोप केला आणि म्हटले, ‘संघाचे बाकी खेळाडू हे विदेशात जाऊन चुकीची काम करतात’. रिवाबाच्या या वक्तव्याने सर्वजण हैराण झाले आणि त्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम कल्चरबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
रिवाबा पुढे असं देखील म्हणाली की, जडेजाला वाटलं तर तो सुद्धा हे सगळं करू शकतो त्याला मला विचारायची गरज नाही. पण त्याला त्याच्या जबाबदाऱ्या माहितीयेत आणि तो नेहमी त्याच्या शिस्तीत राहतो. रिवाबाचं हे स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. असं पहिल्यांदाच नाही की रिवाबा कोणत्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आली आहे. पण तिने इतर क्रिकेटर्सच्या आचरणाबाबत प्रश्न उपस्थित केल्याने हा मुद्दा मोठा झाला आहे.
आयपीएल 2026 मध्ये नव्या संघासोबत दिसणार जडेजा
आयपीएल 2026 मध्ये रवींद्र जडेजा हा राजस्थान रॉयल्स सोबत खेळताना दिसणार आहे. जवळपास 12 वर्षांनी जडेजा सीएसके सोडून कोणत्या अन्य संघाकडून खेळेल. आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने इंग्लंडचा खेळाडू सॅम करन आणि रवींद्र जडेजा या दोघांना राजस्थान सोबत ट्रेड केलं आणि संजू सॅमसनला सीएसकेमध्ये घेतलं.


